अमोल कोल्हे यांनी राजीनामा दिला?, शरद पवार यांच्यासोबत बंद दाराआड काय चर्चा झाली? पाहा व्हिडीओ…
खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. यानिमित्त त्यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाली. यानंतर अमोल कोल्हे यांनी माधमांशी संवाद साधला.
मुंबई : खासदार अमोल कोल्हे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाली. यावेळी माध्यमांसमोर बोलताना त्यांनी, “खरंतर मी माझी अस्वस्थता शरद पवार यांच्यासमोर मांडली. आज एकूण महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि एकूण घडामोडी बघितल्या तर राजकारणातील नैतिकता, विश्वासार्हता, उत्तरदायीत्व या सगळ्याच गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मी शरद पवार यांना जे पत्र दिलंय त्याच एवढंच सांगितलंय की, मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याच भूमिका करत आलो आहे. त्यामुळे 350 वर अस्तित्वात असलेले स्वराज्य निर्माण केल्यानंतरही त्याला स्वत:चं नाही तर रयतेचं राज्य म्हणणाऱ्या महाराजांचा आदर्श घेऊन मी महाराष्ट्रात आलो.आता एकूण जी परिस्थितीत पाहतोय, ते पाहिल्यावर मतदारांना फसवल्यासारखं होतंय का? ही सगळी अस्वस्थथा होती. म्हणून…”, अमोल कोल्हे यांनी राजीनामा दिली की नाही? यासाठी पाहा हा व्हिडीओ…