MLA Amol Mitkari : कोल्हापूरच्या मातीशी जो नडला; सोमय्यांना राष्ट्रवादीचा इशारा
अमोल मिटकरी यांनी टीका करताना, यामिनी जाधव , यशवंत जाधव, प्रताप सारणाची आणि भावना गवळी यांच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी खालच्या पातळी जात टीका केली होती. आरोप केले होते. पण जेव्हा ते सरेंडर झाले शिंदे गटाला आणि भाजपला त्यांच्या चौकश्या बंद कराव्या लागल्या.
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने कारवाई केली. त्यांच्या घरावर आणि इतर ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. त्यावरून आता भाजपचे नेते, माजी खासदार किरट सोमय्या यांच्यासह शिंदे-भाजप सरकारवर टीका होताना दिसत आहे. भाजपचे नेते, माजी खासदार किरट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि काहीच दिवसांनी मनी लाँडरींग प्रकरणी हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीचा छापा पडला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे.
अमोल मिटकरी यांनी टीका करताना, यामिनी जाधव , यशवंत जाधव, प्रताप सारणाची आणि भावना गवळी यांच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी खालच्या पातळी जात टीका केली होती. आरोप केले होते. पण जेव्हा ते सरेंडर झाले शिंदे गटाला आणि भाजपला त्यांच्या चौकश्या बंद कराव्या लागल्या.
पण जे धमक्यांना भीक घालत नाहीत अशांना त्रास दिला जात आहे. नवाब मलिक, संजय राऊत, अनिल देशमुख यांना त्रास दिला गेला. आज परत त्यांनी राष्ट्रवादीशी पंगा घेतला आहे. २०२४ मध्ये हिशेब चुकता राष्ट्रवादी केल्याशिवाय राहणार नाही.
तर मी किरीट सोमैयांना सांगतो जी मस्तीची भाषा करत आहात की परब, यांचा, त्यांचा नंबर आहे. आता मुश्रीफ या चुकीच्या माणसाशी पंगा घेतला आहे. कोल्हापूरच्या मातीशी जो नडतो त्याला कोल्हापूरची माती गाडते. तोतली जबाणला झणझणी चपराक मिळेल