'गिरीश महाजन यांना अकोल्याचे पालकमंत्री बनवा', राष्ट्रवादीच्या नेत्याची फडणवीस यांच्याकडे मागणी?

‘गिरीश महाजन यांना अकोल्याचे पालकमंत्री बनवा’, राष्ट्रवादीच्या नेत्याची फडणवीस यांच्याकडे मागणी?

| Updated on: Aug 01, 2023 | 11:06 AM

अहमदनगरच्या शेवगाव येथे दंगल होते तर तिथे पालकमंत्री लगेच पोहोचतात.तर त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या घटनेची देवेंद्र फडणवीस SIT चौकशीची मागणी करतात, मग अकोल्याला का वंचित ठेवता?पालकमंत्री आमचे देव आहेत. देवेंद्र फडणवीस यांना अकोल्यामध्ये यायची इच्छा नसेल तर त्यांनी त्यांच्या कुठल्याही आमदारला पालकमंत्री पद द्या.

अकोला : ‘महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. अकोला शहरात दंगल झाली पण अजूनही पालकमंत्री यांचा दौरा नाही. अहमदनगरच्या शेवगाव येथे दंगल होते तर तिथे पालकमंत्री लगेच पोहोचतात. त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या घटनेची देवेंद्र फडणवीस SIT चौकशीची मागणी करतात, मग अकोल्याला का वंचित ठेवता?पालकमंत्री आमचे देव आहेत. देवेंद्र फडणवीस यांना अकोल्यामध्ये यायची इच्छा नसेल तर त्यांनी त्यांच्या कुठल्याही आमदारला पालकमंत्री पद द्या.अकोल्यात काहीही झालं तर गिरीश महाजन यांना पाठवण्यात आलं. त्यांचा आणि दंगलीचा काय संबंध? अकोलेकरांबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्या मनात राग आहे का? नाहीतर त्यांनी गिरीश महाजन यांना पालकमंत्री बनवाव’, अशी मागणी यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

अमोल मिटकरी यांनी राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘भरत गोगावले यांची निवड बेकायदेशीर नाही असे विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर बोलले याचा अर्थ स्पष्ट आहे. शिंदे फडणवीस सरकार 2024 पर्यंत कायम राहील हे नार्वेकर यांनी पक्क केलं आहे.’ ‘तर भडकाव भाषण केल्याप्रकरणी कालीचरण महाराजांवर सिल्लोड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराज म्हणणं म्हणजे त्या महाराज शब्दाचा अपमान आहे.कालच्या महाराजांची पार्श्वभूमी काय आहे हे सर्व अकोलेकरांना माहित आहे.वारंवार भडकावू भाषण करून वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा महाराजांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.’ ‘भगतसिंग कोसरी यांचे स्वागत करण्यासाठी जी लोक विमानतळावर गेली त्यांना लाज वाटायला पाहिजे जो व्यक्ती थोर पुरुषांचा अपमान करतो त्याचं तुम्ही विमानतळावर जाऊन स्वागत करता. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे असं म्हणतं भगतसिंह कोशियारी वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा’, अशी मागणीही मिटकरी यांनी केली आहे.

Published on: May 17, 2023 09:10 AM