Amol Mitkari | अपयशी नेत्याला काय उत्तर देणार, राज ठाकरेंना मिटकरींचं उत्तर
साधारणपणे आपण 99 साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण 99 नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं मी म्हणालो होतो, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलं आहे. ट्वीटरच्या माध्यमातून मिटकरी यांनी राज ठाकरेंवर थेट राष्ट्रद्रोहाचा आरोप केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच राज्यात जातीपातींमध्ये द्वेष वाढल्याचा पुनरुच्चार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केलाय. साधारणपणे आपण 99 साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण 99 नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं मी म्हणालो होतो, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलं आहे. ट्वीटरच्या माध्यमातून मिटकरी यांनी राज ठाकरेंवर थेट राष्ट्रद्रोहाचा आरोप केला आहे.
‘राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप कोण करतोय तर ज्यांनी महाराष्ट्रात दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचे महापातक करून “राष्ट्रद्रोह” केला ती व्यक्ती! अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणे आहे’, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.