“कॅबिनेट मंत्रिपदासाठी नितेश राणे आणि पडळकर यांच्यामध्ये स्पर्धा”, अमोल मिटकरी यांचा टोला
"कॅबिनेट मंत्रिपदासाठी नितेश राणे आणि पडळकरांमध्ये स्पर्धा लागली आहे, असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे. गोपीचंद पडळकर आणि नितेश राणे हे सातत्याने मविआच्या नेत्यांवर टीका करत असतात.
पुणे : “कॅबिनेट मंत्रिपदासाठी नितेश राणे आणि पडळकरांमध्ये स्पर्धा लागली आहे, असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे. गोपीचंद पडळकर आणि नितेश राणे हे सातत्याने मविआच्या नेत्यांवर टीका करत असतात. याला प्रत्युत्तर म्हणून अमोल मिटकरी यांनी,”ज्याच्या तोंडात 24 तास विष असतं, तो विषारीच बोलणार. आज पवार कुटुंबीयांविषयी बोलण्यासाठी काही सुपारी बहाद्दर भाजपमध्ये आहेत, त्यातील हा एक सुपारी बहाद्दर आहे. पडळकर यांना सांगितलं आहे की, फक्त पवार कुटुंबीयांविषयी बोलायचं म्हणजे कॅबिनेट मंत्री पद मिळेल. पण कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्यासाठी ज्ञान, बुद्धीमत्ता आवश्यक असते. त्यामुळे आपला आवाका किती, आपण बोलतो किती हे एकदा तपासलं पाहिजे. कितीही विष ओकण्याचा प्रयत्न केला, तरी विष ओकणाऱ्यांना कॅबिनेटमध्ये स्थान नसणार. भाजपमध्ये एवढी तरी आचारसंहिता किंवा लाज ,शरम असेल,अशा लोकांना ते स्थान देणार नाही. गोपीचंद पडळकर असो किंवा नितेश राणे यांच्यामध्ये मंत्रिपदासाठी स्पर्धा लागली आहे, त्यामुळे ते खालच्या पातळीवर टीका करत असतात, असा टोला लगावला.