जितेंद्र आव्हाड यांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी यांनी सुनावलं; म्हणाले, शरद पवार...

जितेंद्र आव्हाड यांच्या ‘त्या’ विधानावर अमोल मिटकरी यांनी सुनावलं; म्हणाले, “शरद पवार…”

| Updated on: Jul 05, 2023 | 9:31 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोर आमदारांना त्यांचा फोटो न लावण्याचे आदेश दिले आहेत. तर, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांचा फोटो वापरण्यास आक्षेप घेतला होता. आता अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांना सुनावलं आहे.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोर आमदारांना त्यांचा फोटो न लावण्याचे आदेश दिले आहेत. तर, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांचा फोटो वापरण्यास आक्षेप घेतला होता. आता अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांना सुनावलं आहे.”पवारसाहेब जितेंद्र आव्हाड यांची खासगी मालमत्ता नाही. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचा फोटो लावणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यांनी असे बोलू नये, माझी त्यांना विनंती आहे,” असे देखली मिटकरींनी स्पष्ट सांगितले.

Published on: Jul 05, 2023 09:31 AM