Amravati Missing girl: सहा तासांच्या शोधानंतर अमरावतीतील बेपत्ता मुलगी सापडली

| Updated on: Sep 08, 2022 | 9:45 AM

सातारा पोलिसांचे पथक मुलीला अमरावती येथे घेऊन येत असल्याचे त्यांनी सांगितले.  या प्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले होते पण ठोस माहिती न मिळाल्याने तपासात अडथळे येत असल्याचे आरती सिंह म्हणाल्या.

कथित लव्ह जिहाद प्रकरणी बेपत्ता असलेलय मुलीला शोधण्यात पोलिसांना यश आलेले आहे. सहा तासांच्या शोध मोहिमेनंतर तिला सुखरूप अमरावती जिल्ह्यात आणण्यात येत आहे. बेपत्ता मुलगी सध्या सातारा पोलिसांच्या ताब्यात असून सुखरूप असल्याची माहिती पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिली. सातारा पोलिसांचे पथक मुलीला अमरावती येथे घेऊन येत असल्याचे त्यांनी सांगितले.  या प्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले होते पण ठोस माहिती न मिळाल्याने तपासात अडथळे येत असल्याचे आरती सिंह म्हणाल्या. पोलिसांनी अत्यंत कमी कालावधीत मुलीची सुटका केल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Published on: Sep 08, 2022 09:45 AM