नवनीत राणा धमकी प्रकरणात ट्वीस्ट; धमकी देणाऱ्या मागे कोण? पोलीसांनी काय व्यक्त केला संशय?
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना धमकी आल्याने एकच खळबळ उडालेली आहे. भुजबळ आणि नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
अमरावती : 23 ऑगस्ट 2023 | एक दिवसांपुर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तर त्यांना गेल्या आठ-नऊ दिवसापासून ठार मारू असे फोनवर धमकी देण्यात येत होती. तर तुम्ही गर्दीत जाता, फिरता तेथेच तुमच्यावर सपासप वार करून ठार करू. यात तुम्ही कधी मराल हे कळणार देखील नाही अशा धमकीसह अशश्लिल शिविगाळ केली होती. त्याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर अमरावती शहर गुन्हे शाखेने मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथून विठ्ठलराव नामक व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. तर आता त्याच्या चौकशीत आरोपीने कुणाच्या तरी सांगण्यावरून ती धमकी दिल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे.
Published on: Aug 23, 2023 10:06 AM
Latest Videos