हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; आता हमीभावाप्रमाणे विक्री करता येणार

हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; आता हमीभावाप्रमाणे विक्री करता येणार

| Updated on: Feb 27, 2023 | 9:42 AM

राज्यभरातील शेतकऱ्यांना हमीभावाने हरभरा विक्री करण्यासाठी आजपासून नाफेडमध्ये हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. पाहा...

अमरावती : हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी… राज्यभरातील शेतकऱ्यांना हमीभावाने हरभरा विक्री करण्यासाठी आजपासून नाफेडमध्ये हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. लवकरच राज्यात शासकीयदराने हरभरा खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे. 5 हजार 334 रुपये प्रतिक्विंटल, असा सध्या हरभऱ्याला हमी भाव आहे. मागच्या काही दिवसांपासून नाफेडमध्ये नोंदणी कधी सुरू होणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे नाफेडची नोंदणी सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी खाजगी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर हरभरा विकला. पण आता ही नोंदणी करता येणार आहे. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथे हमीभावाने हरभरा खरेदीसाठीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं.

Published on: Feb 27, 2023 09:42 AM