“सावरकरांची बदनामी करणाऱ्यांमध्ये शिवानी वडेट्टीवार यांचंही आता अॅडमिशन झालंय”
Anil Bonde On Shivani Wadettiwar : शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकरांचं पुस्तक व्यवस्थित वाचावं; कुणाचा सल्ला? पाहा सविस्तर व्हीडिओ...
अमरावती : भाजप खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेसच्या युवा नेत्या शिवानी वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे. “शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकरांचं सहा सुवर्ण पाने हे पुस्तक वाचावं. त्यामध्ये बलात्काराचं कुठलंही समर्थन नाही. परंतु हिंदूंच्या नीती मूल्यामुळे हिंदूंचं खच्चीकरण सातत्याने केला जात होतं. हे मात्र सावरकरांनी पुस्तकात नमूद केलंय. अभ्यासक म्हणून जर शिवानी वडेट्टीवार मतं मांडत असेल तर त्यांनी ते पुस्तक चांगल्या पद्धतीने वाचलं पाहिजे. सावरकरांची बदनामी करणाऱ्यांमध्ये शिवानी वडेट्टीवार अॅडमिशन झालं आहे, असं अनिल बोंडे म्हणाले आहेत. शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. अनिल बोंडे यांनीही त्यांच्यावर टीकास्त्र डागलंय.