उद्धवजींच्या जागेवर बसा, मग कळेल शिवसेना काय आहे ते...; ठाकरे गटाच्या नेत्याचं विरोधकांना आव्हान

उद्धवजींच्या जागेवर बसा, मग कळेल शिवसेना काय आहे ते…; ठाकरे गटाच्या नेत्याचं विरोधकांना आव्हान

| Updated on: Apr 12, 2023 | 1:20 PM

ठाकरे गटाच्या नेत्याचं विरोधकांना आव्हान; शिवसेना समजून घ्यायची असेल तर उद्धवजींच्या जागेवर बसा, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

अमरावती : शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दिलेला राजीनामा आणि वज्रमूठ सभेवर भाष्य केलंय. मला अस वाटतं या विषयावर आता भाष्य करण्याची गरज नाही. जे व्हायचं ते होऊन गेलं आहे. पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे. फक्त आता वज्रमूठ सभेवर बोललं पाहिजे. तो विषय तांत्रिक वाटत असला तरी उद्धवजी ठाकरेच्या जागेवर बसा मग कळेल शिवसेना काय आहे, असं अरविंद सावंत म्हणाले आहेत. सवंगडी सोडून जात असताना उद्धव ठाकरे पदाला चिटकून कसे बसतील? तेव्हा त्यांनी राजीनामा दिला, असंही अरविंद सावंत म्हणाले आहेत. ते अमरावतीत बोलत होते.

Published on: Apr 12, 2023 01:16 PM