अमरावतीत बाजार समितीसाठी आज मतदान; दोन माजी मंत्री अन् रवी राणा यांची प्रतिष्ठा पणाला

अमरावतीत बाजार समितीसाठी आज मतदान; दोन माजी मंत्री अन् रवी राणा यांची प्रतिष्ठा पणाला

| Updated on: Apr 28, 2023 | 9:20 AM

Amravati Krishi Utpanna Bazar Samiti Election 2023 : अमरावती जिल्ह्यातील 6 कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी आज मतदान, रवी राणा यांची प्रतिष्ठा पणाला...

अमरावती : राज्यात सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होतेय. आज मतदान प्रक्रिया पार पडतेय. अमरावती जिल्ह्यातील 12 पैकी 6 कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील आज मतदान पार पडतंय. त्यामुळे राज्याचे माजी कृषीमंत्री, भाजप खासदार डॉ अनिल बोंडे, माजी मंत्री, काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर आणि आमदार रवी राणा यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार रवी राणांचे बंधू सुनील राणा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. अमरावती, मोर्शी, तिवसा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अमरावती,तिवसा, नांदगाव खंडेश्वर, चांदुर रेल्वे,अंजनगावसुर्जी आणि मोर्शी या बाजार समितीसाठी आज मतदान होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण जिंकणार? हे पाहणं महत्वाचं असेल.

Published on: Apr 28, 2023 09:20 AM