देवेंद्रजी, तुमच्यामुळे अमरावतीचा विकास , पण आता मेळघाटासाठी एवढं एक काम करा; नवनीत राणा यांची मागणी

देवेंद्रजी, तुमच्यामुळे अमरावतीचा विकास , पण आता मेळघाटासाठी एवढं एक काम करा; नवनीत राणा यांची मागणी

| Updated on: Apr 10, 2023 | 1:36 PM

Amravati News : खासदार नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक मागणी केली आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या आहेत? पाहा...

अमरावती : अमरावतीमधील शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आहेत. यावेळी बोलताना खासदार नवनीत राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक मागणी केली आहे. अमरावतीत टेक्सटाईल पार्क व्हावं हे माझं एक स्वप्न होतं. 7 टेस्टस्टाइल पार्कला मंजूरी मिळाली. त्यातील एक टेक्स्टाईल पार्क अमरावतीला देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळाला. आम्ही ज्यांच्या सोबत आहे त्या भागाला वाऱ्यावर सोडणार नाही, असा त्यांचा ध्यास आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आता फक्त मेळघाटातील रुग्णांना आणण्यासाठी एक बस देण्यात यावी, एवढीच विनंती आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

Published on: Apr 10, 2023 01:36 PM