हनुमानगढीवरील माती अमरावतीत आणणार; आमदार रवी राणा आज अयोध्याला जाणार
Amravati News : आमदार रवी राणा सुद्धा आज अयोध्याला जाणार आहेत. यावेळी रवी राणा नेमकं काय म्हणालेत? पाहा व्हीडिओ...
अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. अशात आमदार रवी राणा सुद्धा आज अयोध्याला जाणार आहेत. “अयोध्येतील हनुमानगढी येथील माती अमरावतीत आणणार. अमरावती येथील हनुमानजींच्या 111 फुटाच्या मूर्तीच्या पायाभरणीसाठी अयोध्येतील माती वापरणार आहोत. अयोध्येमधील माती भक्ती शक्ती मंगल रथातून आणणार आहोत”, असं रवी राणा म्हणालेत. तर तिकडे अयोध्या नगरीत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतच खासदार नवनीत राणा यांचेही पोस्टर लावण्यात आले आहेत. अयोध्येच्या शरयू घाटावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदार नवनीत राणा यांचे बॅनर आणि पोस्टरही लावण्यात आले आहेत.
Published on: Apr 08, 2023 10:53 AM
Latest Videos