श्रीरामाने वडीलांच्या वचनासाठी…पण काही लोक सत्तेसाठी वडीलांचे शब्द विसरतात, अमृता फडणवीस यांचा टोला
अमृता फडणवीस यांनी पुन्हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांचे नाव न घेता टोमणा मारला आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून उत्तम काम करीत असल्याचे त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुंबई | 10 फेब्रुवारी 2024 : राज्यातील गुन्हेगारीचा चढता आलेख पाहून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माजी मुख्यमंत्री शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. देवेद्र फडणवीस यांनी गाडी श्वान आला तरी लोक राजीनामा मागतील अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी कुत्र्याला श्वान म्हटल्याने आपण सुसंस्कृत ठरत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सर्व हद्दपार केली आहे. असा मनोरुग्ण गृहमंत्री राज्याला लाभला असल्याची टीका त्यांनी केली आहे. प्राण्यांच्या रक्षणाची जबाबदारीही राज्याच्या प्रमुखांची असते, परंतू मुख्यमंत्रीच गुंडासोबत फोटो काढत आहेत अशी टीका ठाकरे यांनी केली आहे. यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काही श्री रामाने वडीलांना दिलेल्या वचनासाठी वनवास पत्करला होता. परंतू काही लोक सत्तेसाठी वडीलांच्या शब्दांना विसरतात असा टोमणा माराला आहे. उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता अमृता यांनी त्यांना डीवचल्याचे म्हटले जात आहे.