अमृता फडणवीस म्हणतात, मला ट्रोलिंगची सवय झालीय

अमृता फडणवीस म्हणतात, मला ट्रोलिंगची सवय झालीय

| Updated on: Jan 10, 2023 | 6:54 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी उर्फी-चित्रा वाघ यांच्या वादावर आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना पत्रकारांनी त्यांना एक प्रश्न विचारला ज्यावर त्यांनी उत्तर देताना आता मला त्याची सवय झाल्याचे म्हटलं आहे.

पुणे : राज्यात वादाचे पर्व सुरू आहे. अनेक वादग्रस्त विधानावरून सध्या राज्यात राजकारण सुरू आहे. त्यादरम्यानच आता अभिनेत्री, मॉडेल उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद आता चांगलाच रंगला आहे. पत्रकार परिषद त्यावर ट्वीटवरून प्रत्युत्तर असा मामला उर्फी- चित्रा वाघ यांच्या वादात पहायाला मिळत आहे. यादरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी उर्फी-चित्रा वाघ यांच्या वादावर आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना पत्रकारांनी त्यांना एक प्रश्न विचारला ज्यावर त्यांनी उत्तर देताना आता मला त्याची सवय झाल्याचे म्हटलं आहे.

फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांना पत्रकारांना तुम्हाला ट्रोल केले जाते तेव्हा कशी भावना असते असा सवाल केला. त्यावर बोलताना मिसेस फडणवीस म्हणाल्या, आता याची मला सवय झाली आहे. लोक ट्रोल करतात. मी मी जरी भजन म्हटलं तरी मला ट्रोल केलं जात आता याची सवय झाली आहे, असं म्हटलं आहे. नुकताच अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे ‘मूड बना लिया वे’ रिलीज झाले आहे.

Published on: Jan 10, 2023 06:54 PM