Amul, Mother Dairy Milk Price Hike : अमूल, मदर डेअरीनंतर इतर कंपन्यांच्या दूध दरात वाढ, सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा फटका

Amul, Mother Dairy Milk Price Hike : अमूल, मदर डेअरीनंतर इतर कंपन्यांच्या दूध दरात वाढ, सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा फटका

| Updated on: Aug 18, 2022 | 12:19 PM

Amul, Mother Dairy Milk Price Hike  : गेल्या काही दिवसांपासून दूध उत्पादकांना अच्छे दिन येत आहेत. तीन महिन्यांपूर्वीच दुधाच्या दरात वाढ झाली होती. ही दरवाढ 17 ऑगस्टपासून करण्यात आलीय

मुंबई :  अमूल, मदर डेअरीनंतर इतर कंपन्यांच्या दूध दरात वाढ केली आहे. यामुळे सर्वेसामान्यांना फटका बसतोय. ही दरवाढ दोन रुपयांनी करण्यात  आली  आहे. पुन्हा (Amul Milk) अमूल आणि मदर दुध डेअरीच्या दरात वाढ झाली आहे. लिटरमागे 2 रुपयांनी दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला 3.5, 8.5 या फॅटसाठी लिटरमागे 37 रुपये मिळतील असा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून (Milk producer) दूध उत्पादकांना अच्छे दिन येत आहेत. तीन महिन्यांपूर्वीच (Milk Rate Hike) दुधाच्या दरात वाढ झाली होती. ही दरवाढ 17 ऑगस्टपासून करण्यात आली आहे . ही माहिती अमूल आणि मदर डेअरीनं अधिकृतपणे सांगितले आहे. तर आता यातच इतर कंपन्यांनी देखील दरवाढ केल्याची माहिती  समोर आली  आहे. त्यामुळे त्याचा फायदा आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच होणार. तर सर्वसामान्यांना महागाईचा सामना हा करावा लागणार  आहे.

Published on: Aug 18, 2022 12:19 PM