‘या’ मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका संपावर; 1 लाख 30 हजार चिमुकले पोषक आहाराविना
अमरावतीत अंगणवाडी सेविका संपावर गेल्या आहेत. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील 1 लाख 30 हजार चिमुकले पोषकआहार विनाच आहेत. पाहा व्हीडिओ...
अमरावती : अमरावतीत अंगणवाडी सेविका संपावर गेल्या आहेत. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील 1 लाख 30 हजार चिमुकले पोषकआहार विनाच आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा,पगार वाढ या मागण्यांसाठी तीन दिवसांपासून अंगणवाडी सेविका संपावर आहेत. अमरावती जिल्ह्यातील 2366 अंगणवाडी सेविकांचा संपावर गेल्या आहेत. त्यामुळे 2646 अंगणवाडी केंद्र बंद आहेत. आज अमरावती शहरातून अंगणवाडी सेविकांचा भव्य मोर्चा निघणार आहे. आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा आम्ही आंदोलन सुरूच ठेवू, असा पवित्रा या अंगणवाडी सेविकांनी घेतला आहे. त्यामुळे या संपाची दखल शासकीय पातळीवर घेतली जाणार का हे पाहणं महत्वाचं असेल.
Published on: Feb 23, 2023 08:25 AM
Latest Videos

धसांच्या विरोधात चंद्रशेखर बावनकुळेंचाच ट्रॅप, राऊतांचा सनसनाटी दावा

'... त्यांना डोकं चेक करण्याची गरज', उदयनराजेंचा आयुक्तांना सल्ला

राहुल गांधी अन् मोदी ट्विट करतांना चुकले? शिवरायांना वाहली श्रद्धांजली

शिवसेना फुटीच खापर ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदावर,पवारांचा शिंदेंना विरोध
