पहिल्या पावसाचा कहर; घाटकोपरमध्ये इमारतीचा भाग कोसळला, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

पहिल्या पावसाचा कहर; घाटकोपरमध्ये इमारतीचा भाग कोसळला, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

| Updated on: Jun 25, 2023 | 2:24 PM

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईवर ढग तयार होत होते. त्यामुळे आता लवकरच पाऊस याची खात्री मुंबईकरांना होती. मात्र गेल्या 24 तासाच असा काही पाऊस झाला की मुंबईकरांची त्रेधात्रिपटी झाली. याचदरम्यान घाटकोपर येथे मोठी दुर्घटना घडली.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे अनेकांच्या नजरा या पावसाकडे लागल्या होत्या. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून मुंबईवर ढग तयार होत होते. त्यामुळे आता लवकरच पाऊस याची खात्री मुंबईकरांना होती. मात्र गेल्या 24 तासाच असा काही पाऊस झाला की मुंबईकरांची त्रेधात्रिपटी झाली. याचदरम्यान घाटकोपर येथे मोठी दुर्घटना घडली. ज्यामुळे फायर ब्रिगेडसह एनडीआरएफच्या टीमला पाचारण करावे लागले आहे. येथील विद्याविहारमधील राजावाडी कॉलनी येथील इमारतीचा भाग कोसळून दुर्घटना घडली आहे. ज्यात इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दोन जण अद्यात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नजिकच्या राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. तर पहिल्या पावसामुळे ही तीन मजली इमारत जमिनीत धसली आहे. ज्यामुळं बाहेर ऊभ्या असलेल्या गाड्यांचाही नुकसान झालं आहे. तर लोकांना बाहेर काढण्यासाठी फायर ब्रिगेडच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या असून ते शर्तीचे प्रयत्न करत आहेत.

Published on: Jun 25, 2023 02:24 PM