हाती मशाल, उद्धव ठाकरेंच्या सभास्थळापर्यंत अनवाणी प्रवास; कोण आहे ‘तो’ निष्ठावंत?

| Updated on: Apr 02, 2023 | 3:36 PM

VIDEO | महाविकास आघाडीच्या 'वज्रमूठ' सभेसाठी हातात मशाल आणि 60 किलो मीटरचा अनवाणी प्रवास; ठाकरेंचा असाही निष्ठावंत

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये होत असलेल्या उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सभेसाठी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील एका लहानशा गावातून एक निष्ठावंत उद्धव ठाकरे यांचा चाहता तब्बल साठ किलोमीटरवरून बिना चपलेचा अनवाणी पायाने हातात मशाल आणि उद्धव ठाकरे यांचा झेंडा घेऊन चालत आलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी मी हा त्रास सहन करतोय असं या उद्धव ठाकरे यांच्या चहात्याने सांगितलं आहे. तर चंद्रकांत खैरे यांनीही हात जोडत या कार्यकर्त्याला मी नतमस्तक होतो, अशी प्रतिक्रिया दिली आणि ते म्हणाले हे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरचं प्रेम आहे. शिवसेनेतून जे गेले ते केवळ खोके आणि काँन्ट्रॅक्टरसाठी गेले. बाकी खरे शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे त्यांनी म्हटले. तर अंकुश पुंडलिक पवार असे या उद्धव ठाकरे यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याचे नाव आहे. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली बघा व्हिडीओ

Published on: Apr 02, 2023 03:36 PM
बागेश्वर बाबा, कालीचरण महाराजांवरून आव्हाड भडकलेच म्हणाले, या सरकारला…
‘मविआ’च्या वज्रमूठ सभेवर उदय सामंत यांचं टीकास्त्र, बघा काय केला हल्लाबोल