कल्याणमध्ये भररस्त्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
कल्याण पूर्वेत एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर एका सराईत गुन्हेगाराने भररस्त्यात अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
कल्याण, 03 ऑगस्ट 2023 | कल्याण पूर्वेत एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर एका सराईत गुन्हेगाराने भररस्त्यात अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थिनीचा स्कुटी वरून पठलाग करत तिला रस्त्यावर खाली पाडत अत्याचाराचा प्रयत्न केला. या वेळी विद्यार्थिनीने आरडा-ओरडा करत स्वतः वाचवण्यासाठी आरोपीला नख आणि लाथ मारली. तेथून पळ काढत मुलीने पोलीस स्टेशन गाठलं. विशाल गवळी असे या आरोपीचे नाव असून पोलिसांच्या माहिती नुसार आरोपी विशाल हा सराईत गुन्हेगार आहे. याआधी आरोपीविरोधात बलात्कार, विनंयभंगाचे पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. याशिवाय आरोपीवर चोरीचे देखील गुन्हे दाखल आहेत. विशालला याआधी तडीपार देखील करण्यात आले होते. मात्र आरोपी एक राजकीय नेत्यांचा नातेवाईक असल्याने या गुन्हातून बिनधास्तपणे सुटून येतो व पुन्हा तेच करण्यास सुरुवात करतो.