गोंदियात आमदाराने अत्यंत खालच्या भाषेमध्ये कर्मचाऱ्यांना केली दमदाटी, ऑडीओ क्लीप व्हायरल
अग्रवाल यांनी 2022 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करत अनेकांना धक्का दिला होता. ते शिवसेनेचे सदस्य होते. त्यानंतर त्यांच्या कार्यालयावर हल्ला झाला होता. दोन घटनांमुळे ते प्रकाश झोतात आले होते. यानंतर आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.
गोंदिया : गोंदिया येथील अपक्ष आमदार विनोद अग्रवाल हे सध्या भलतेच चर्चेत आले आहेत. आधी अग्रवाल यांनी 2022 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करत अनेकांना धक्का दिला होता. ते शिवसेनेचे सदस्य होते. त्यानंतर त्यांच्या कार्यालयावर हल्ला झाला होता. दोन घटनांमुळे ते प्रकाश झोतात आले होते. यानंतर आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी ते एका ऑडिओ क्लिप चर्चेत आले असून त्यांचीच ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यावरून सध्या चर्चा सुरू आहे. या ऑडिओ क्लिप अग्रवाल यांची जीभ घसरल्याचे समोर येत आहे. त्यांच्याकडून जिल्हा परिषदच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्याला अत्यंत खालच्या दर्जात शिवीगाळ झाली आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्याला बारा टेंडर मंजूर का झाले नाही. याविषयी फोनवर कर्मचाऱ्यास त्यांनी दमदाटी केली आहे. हा ऑडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरस होत आहे. तर जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.