गुन्हा केलाच नाही तर शिक्षा का? आव्हाडांचा भावनिक सवाल

गुन्हा केलाच नाही तर शिक्षा का? आव्हाडांचा भावनिक सवाल

| Updated on: Jan 09, 2023 | 10:32 AM

आव्हाड यांचा सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात त्यांच्या एका हातात कुराण तर दुसऱ्या हातात भगवद्गीता आहे. आव्हाड यांनी हा व्हीडिओ त्यांच्यावर एका महिलेने आरोप केल्यानंतर बनवला आहे.

ठाणे: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांनी आपण तसे नाही बोललो, असे म्हणत सावरा सावर केली. आता पुन्हा एकदा आव्हाड हे त्यांच्या एका व्हीडीओमुळे चर्चेत आले आहेत. ज्यात ते भावनिक झालेले दिसत आहेत. तर जो गुन्हा मी केला नाही त्याची शिक्षा मी का भोगू? असा सवाल करताना दिसत आहेत.

आव्हाड यांचा सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात त्यांच्या एका हातात कुराण तर दुसऱ्या हातात भगवद्गीता आहे. आव्हाड यांनी हा व्हीडिओ त्यांच्यावर एका महिलेने आरोप केल्यानंतर बनवला आहे. सध्या तोच प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. त्यावर राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा रंगली आहे.

या व्हिडीओतून जितेंद्र आव्हाड आपलं म्हणणं मांडताना दिसत आहेत. तसेच आपल्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचा डाव आखला जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी जे मी केलं नाही त्याची शिक्षा मी का भोगू? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी या व्हिडीओतून विचारला आहे.

Published on: Jan 09, 2023 10:32 AM