केसीआर राव यांना एवढ्या लवकर मस्ती येईल वाटलं नव्हतं, आनंद अडसूळ यांचा निशाणा

“केसीआर राव यांना एवढ्या लवकर मस्ती येईल वाटलं नव्हतं”, आनंद अडसूळ यांचा निशाणा

| Updated on: Jun 29, 2023 | 10:49 AM

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाच्या महाराष्ट्र प्रवेशानंतर शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, केसीआर राव यांना असं वाटतं आम्ही इतर राज्यात देखील जाऊन माझी सत्ता प्रस्थापित करू शकतो. पण...

पुणे : तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाच्या महाराष्ट्र प्रवेशानंतर शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, “सामान्य माणसाच्या खिशात ज्यावेळी जास्त पैसा येतो, त्यावेळी त्याला जशी मस्ती येते तशी तेलंगणात सहज मिळालेली सत्ता यामुळे केसीआर राव यांना असं वाटतं आम्ही इतर राज्यात देखील जाऊन माझी सत्ता प्रस्थापित करू शकतो. मात्र हा त्याचा गोड गैरसमज आहे.के सी राव यांना मी चांगलं ओळखतो आम्ही सभागृहात एकत्र काम केलेलं आहे.त्यांनी आंदोलन करून तेलंगणा राज्यात सत्ता मिळवलेली आहे, इथपर्यंत आम्ही त्यांना महत्व देतो.पण इतक्या लवकर त्यांना एवढी मस्ती येईल असं वाटलं नव्हतं. ही मस्ती आहे आणि अविचारीपणा आहे, त्यामुळे कोणीही त्याला पाठीशी घालण्याची गरज नाही.”

Published on: Jun 29, 2023 10:49 AM