एकनाथ शिंदेंनी आधी एक दोन वेळा केला होता पण; शिवसेना नेत्याचा मोठा खुलासा
Anand Adsul on CM Eknath Shinde : शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना पक्षातील फूट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य केलंय. पाहा ते नेमकं काय म्हणालेत...
शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना पक्षातील फूट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य केलंय. एकनाथ शिंदेंनी आता केलेला प्रयत्न आधी एक दोन वेळा केला होता. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही कारण आतून मनाला काहीतरी बोचतं होतं, असं आनंदराव अडसूळ म्हणाले आहेत. पैसा कुठून कुठपर्यंत गेला याचं उत्खनन करायाचं म्हटलं तर रस्ता मातोश्रीपर्यंत जातो. रिकामटेकड्या लोकांना वाईट गोष्टी सूचत असतात. काही लोकांच्या मागे ईडी जरूर लावली मात्र एकनाथ शिंदेंच्या मागे कुठं ईडी लावली होती?, असा सवालही आनंदराव अडसूळ यांनी केला आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
Published on: Apr 09, 2023 12:14 PM
Latest Videos