Anand Dave On Vande Mataram | वंदे मातरमने मुस्लिमांचं काही नुकसान होत नाही- आनंद दवे- tv9
तर वंदे मातरम् सर्व शाळांमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये कायमचा करावा. त्याची सक्ती करावी. त्याशिवाय मुस्लिमांना सुद्धा आक्कल येणार नाही.
मुंबई : नुकताच राज्याच्या मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री झालेले सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यांच्या हॅलो च्या ऐवजी वंदे मातरम् म्हणा, या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण आता चांगलेच तापत चालले आहे. मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यावर आव्हाड यांनी टीका केल्यानंतर आता आनंद दवे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. आव्हाडांवर टीका करताना ब्राह्मण सहासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी म्हटलं आहे की आव्हाड हे मतदारांची काळजी घेण्यासाठी असे वक्तव्य करत असतात. तर वंदे मातरम् सर्व शाळांमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये कायमचा करावा. त्याची सक्ती करावी. त्याशिवाय मुस्लिमांना सुद्धा आक्कल येणार नाही. हा हिंदुस्थान आहे आणि हिंदूंचाच आहे हे नेहमी हिंदू का दाखवू लागतं असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला. तसेच वंदे मातरमने मुस्लिमांचं काही नुकसान होत नाही असंही दवे म्हणाले.