राज ठाकरेजी,  औरंगजेबाच्या कबरीचादेखील मुद्दा उपस्थित करा; कुणी केली विनंती?

राज ठाकरेजी, औरंगजेबाच्या कबरीचादेखील मुद्दा उपस्थित करा; कुणी केली विनंती?

| Updated on: Mar 23, 2023 | 10:18 AM

Raj Thackeray Gudhi Padava sabha 2023 : औरंगजेब महाराष्ट्राचा शत्रू , त्याची कबर संभाजीनगरमध्ये कशाला?; राज ठाकरे यांना औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उपस्थित करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पाहा व्हीडिओ...

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथे काल गुढीपाडव्या निमित्त सभा झाली. यात त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं. माहिम दर्गाह आणि सांगलीतील मस्जिदचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीचा देखील मुद्दा उपस्थित करावा. औरंगजेब महाराष्ट्राचा शत्रू त्याची कबर संभाजीनगरमध्ये कशाला हवी? राजसाहेब प्रखर हिंदुत्ववादी औरंगजेबच्या कबरी बद्दल त्यांनी निर्णय घ्यावा”, असं आनंद दवे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी पुण्यश्लोक आणि शनिवार वाड्यातील दर्ग्याचा मुद्दा का नाही उचलला? शनिवार वाड्यातील दर्गाहदेखील अनधिकृत आहे. याविरोधात हिंदू महासंघ आंदोलन करणार आहे, असंही आमंद दवे म्हणाले.

Published on: Mar 23, 2023 10:18 AM