“राज ठाकरेजी, तुम्ही दर्गाहचा मुद्दा उपस्थित केलाय खरा, पण तो भोंग्यासारखा विषय होऊ नये”
Raj Thackeray Gudhi Padava sabha 2023 : आजही लाऊड स्पीकर चालू असल्याचं हिंदू महासंघ सांगतच होता ते आज राज ठाकरेंनी मान्य केलं. राजसाहेबांना पण मुस्लिम हवेच आहेत मग भोंग्यांचं काय?, असा सवाल विचारण्यात आला आहे. कुणी विचारलाय? पााहा...
पुणे : काल गुढीपाडव्या निमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथे सभा झाली. यात त्यांनी माहिम इथल्या दर्गाहचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी टीका केली आहे. “समुद्रातील अनधिकृत दर्गाहचा विषय भोंग्या सारखं होऊ नये. दर पाडव्याला सरकारला सूचना देणं. पुढे ते विसरून जाणं. आता नको राजसाहेब…, असं आनंद दवे म्हणाले. एका वाक्याने जावेद जवळचे वाटले पण या आधीच्या त्यांच्या वक्तव्यांचं काय? जावेद अख्तर यांच्या वाक्याचं कोणत्या मुस्लिम नेत्याने स्वागत केलं?, असा सवालही आनंद दवे यांनी विचारला आहे.
Published on: Mar 23, 2023 07:22 AM
Latest Videos