Video : “शरद पवार नेहमी भूमिका बदलतात, त्यांचं नेमकं कोणतं रूप खरं”, आनंद दवे यांचा सवाल
शरद पवारांचं कोणतं रुप खरं, आनंद दवे यांचा सवाल
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्याविषयी एक विधान केलं. त्यावरून त्यांनी घेरण्याचा प्रयत्न होतोय. हिंदू महासंघ आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आहे. जुना फोटो शेअर करत हिंदू महासंघ आनंद दवेंनी शरद पवारांना प्रश्न विचारलाय. “तुम्ही खूप बदलत राहता पवार साहेब आम्हालाच प्रश्न पडलाय की खरे पवार साहेब कोणते? 16 मे 1974 रोजी त्यांनी दादर येथील बाबासाहेब पुरंदरे यांनी उभ्या केलेल्या शिवसृष्टी ला भेट दिली तेव्हा तुम्ही त्यांच यांचे भरभरून कौतुक केल ते सुद्धा लेखी आणि सातारा येथून आणलेल्या भवानी तलवारीच पूजन सुद्धा केलं.त्यावेळी तुम्हाला बाबासाहेब शिव अभ्यासक, शिव भक्त वाटतं होते. आज ते तुम्हाला महाराजांचे शत्रू वाटतं आहेत? कळू द्या एकदा महाराष्ट्र ला खरे पवार साहेब कोणते?”, असं आनंद दवे (Anand Dave) यांनी म्हटलंय.