राज्य कुणाचे जरी असलं तरी आयुष्य कडूच; बच्चू कडू यांचं खोचक वक्तव्य
कडू यांनी, समाजात दोन वर्ग आहेत. एक उपाशी झोपणारा आणि एक तुपाशी खाणारा. या दोन वर्गामध्ये सगळ्या पक्षांना तुपाशी असणाऱ्या लोकांची व्यवस्था केली आहे
मुंबई : गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी, म्हणून सरकारने आनंदाचा शिधा दिली होती. ती यावेळी गुढीपाडव्याला मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला फटकारलं. तसेच याच शिधावरून सरकारवार टीका देखील केली होती. त्यानंतर आता प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर देत टीका केली आहे.
कडू यांनी, समाजात दोन वर्ग आहेत. एक उपाशी झोपणारा आणि एक तुपाशी खाणारा. या दोन वर्गामध्ये सगळ्या पक्षांना तुपाशी असणाऱ्या लोकांची व्यवस्था केली आहे. त्यामुळेच त्यांना नैतिक अधिकार नाहीये. तुम्ही जेव्हा सत्तेत होते तेव्हा सामान्य माणसासोबत काय केलं हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पण सत्तेच्या बाहेर आलो तर तुम्हाला उपाशी लोकांची आठवण येते. देशातल्या जाती नष्ट होत आहेत. धर्मा धर्माचा नष्ट होईल आणि श्रीमंत गरीब कष्ट करणारे आणि हरामखोरीन जगणारे असे दोन वर्ग तयार होतील असेही कडू म्हणाले.