Video : अमरावतीतून आनंदराज आंबेडकर निवडणूक लढविणार, नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ ?
अमरावती येथील निवडणूक चुरशीची होणार आहे. या निवडणूकीत भाजपाने नवनीत राणा यांना तिकीट दिल्याने महायुतीतील घटक पक्ष असलेल्या बच्चू कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता तर रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी येथून अर्ज भरण्याची घोषणा केल्याने स्पर्धा वाढली आहे.
मुंबई : लोकसभेच्या अमरावतीच्या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण येथे महायुतीतील घटक पक्ष बच्चू कडूंचा विरोध डावलून भाजपाने नवनीत राणा यांना कमळावर निवडणूक लढण्याचे आवतण दिले आहे. त्यामुळे बच्चू कडूंनी असहकार पुकारत सर्वांना नवनीत राणा यांना पाडण्याचे आवाहन केले आहे. आता तर अमरावतीतून प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी येत्या 2 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अमरावतीची निवडणूक चुरशीची होणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने येथून कु. प्राजक्ता पिल्लेवान यांचे नाव आधी जाहीर केले आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मागणीवरुनचे आपण येथे निवडणूक लढविणार असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी म्हटले आहे.
Published on: Mar 30, 2024 09:36 PM
Latest Videos