भंडाऱ्यात संतप्त नागरिकांचा रेशन दुकानासमोर गोंधळ आणि रास्तारोको
भंडाऱ्यात संतप्त नागरिकांनी रेशन दुकानासमोर गोंधळ घातला आहे.
भंडारा : राज्य सरकारने दिवाळीसाठी निमित्त रेशन कार्ड (Ration card) धारकांना आनंदाचा शिधा (Anandacha Shidha)वाटप करण्याची घोषणा केली होती. शिधा किटमध्ये 5 वस्तू ह्या दिवाळीसाठी रेशन कार्ड धारकांना देण्यात येणार आहेत. पण ह्या शिधा काही ठिकाणी पोहचल्या आहेत तर काही ठिकाणी त्यांचं अद्यापही वाटप झालं नाही. दिवाळीच्या पहिल्या दिवशी देखील भंडाऱ्यात या शिधा किटचं वाटप न झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी रेशन दुकानासमोर गोंधळ आणि रास्तारोको केला आहे.
Published on: Oct 24, 2022 02:31 PM
Latest Videos