“शिवसेनेचा एकच मेळावा, तो वरळीतच होणार”, ठाकरे गटाचा शिंदेंच्या शिवसेनेला टोला
शिवसेना पक्षाचा उद्या स्थापना दिवस आहे. त्याआधी आज ठाकरे गटाचा वरळीत मेळावा होत आहे. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या एक दिवस आधी राज्यव्यापी शिबिर वरळीत पार पडत आहे. या मेळाव्यात नव्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. दरम्यान या मेळाव्याची रुपरेषा कशी असणार याची माहिती ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी दिली आहे.
मुंबई : शिवसेना पक्षाचा उद्या स्थापना दिवस आहे. त्याआधी आज ठाकरे गटाचा वरळीत मेळावा होत आहे. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या एक दिवस आधी राज्यव्यापी शिबिर वरळीत पार पडत आहे. या मेळाव्यात नव्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पुन्हा पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती होणार आहे. या व्यतिरिक्त पक्षातील नेत्यांच्या फेरनियुक्त्या केल्या जाणार आहेत. दरम्यान या मेळाव्याची रुपरेषा कशी असणार याची माहिती ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी दिली आहे. “राज्यभरातून शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, शाखाप्रमुख उपस्थित असतील. जवळपास 6000 पदाधिकारी या शिबिरात सहभागी होणार आहेत. सकाळी १० वाजता या शिबिराला सुरुवात होईल. सायंकाळी 4 वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पोहोचतील, उद्धव ठाकरे सर्व पदाधिकाऱ्यांना संबोधन करतील. तसेच शिवसेनेचा एकच मेळावा आहे, तो इथेच होणार आहे”, असं अनिल देसाई म्हणाले.