राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी; अनिल देसाई यांनी महत्वाचा मुद्दा उपस्थित केला; म्हणाले…
सर्वोच्च न्यायालयात आज राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीआधी ठाकरेगटाचे नेते अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणालेत? पाहा...
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीआधी ठाकरेगटाचे नेते अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल, अशी अपेक्षा आहे. काही कळीचे मुद्दे आहेत. घटनात्मक पेच आहेत. लोकशाहीवरच प्रश्न निर्माण झाले आहेत. आज सुनावणी पूर्ण होत आहे. निकाल आज येईल, असं वाटत नाही”, असं अनिल देसाई म्हणाले आहेत. एकनाथ शिंदेकडून विधानं वारंवार बदलली जातेय. मविआ विरोधात होतो, असं म्हणताहेत. याची दखल सर्वोच्च न्यायालय घेईल. विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल, निवडणूक आयोग या तिन्ही संस्था यात आहेत. राज्यपालांची भूमिका आणि निवडणूक आयोगाचा निकालावर आमचे प्रश्न आहेत.व्हीप बजावला गेला होता तेव्हा सुनील प्रभू हेच व्हीप होते. त्याचं व्हीप झुगारला गेला. हा मुद्दा महत्त्वाचा आहे, असंही देसाई म्हणालेत.
Published on: Mar 02, 2023 10:29 AM
Latest Videos