सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आधी अनिल देसाई यांची प्रतिक्रिया; या मुद्द्यांकडे लक्ष वेधलं
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आधी ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विविध मुद्द्यांवर त्यांनी लक्ष वेधलंय. पाहा...
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आधी ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विविध मुद्द्यांवर त्यांनी लक्ष वेधलंय. “भारताची लेकशाहीत न्याय होणं आवश्यक आहे. आजच्या सुनावणीत दहाव्या अनुसूचीचा मुद्दा महत्त्वाचा आहे. 21 तारखेपासूनच दहावी अनुसूची लागू होते. जेंव्हा पासून घटना घडली तेंव्हा पासून दहावी अनुसूची लागू होतेय. कायद्यातील तरतूदी लावून प्रकरण निकाली काढावं. दुपारी साडेतीन वाजता निवडणूक आयोगाच्या संदर्भात सुनावणी होणार आहे. अनेक मंडळीनी विश्लेषण केलं आहे. त्या विपरीत निकाल दिला गेला. हा खूप घातक आणि धक्कादायक निकाल आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं विचार करतोय. जर दिल्ली हायकोर्टात पाठवायचं असतं तर काल सुप्रीम कोर्टाने ऐकून घेतो असं म्हटलं नसतं. समता पार्टी डी रजिस्टर का झाली ते पहावं. मेलेल्यांना जिवंत करणं हे हास्यास्पद आणि धोकादायक आहे”, असं अनिल देसाई म्हणालेत.