“स्वत:चा उदोउदो करून जनतेची दिशाभूल केली जातेय”, अनिल देशमुख यांची राज्य सरकारवर टीका
काही दिवसांपूर्वी 'न्यूज एरिना इंडिया' या संस्थेने केलेल्या सर्व्हेत महाराष्ट्रामध्ये भाजपला सव्वाशे जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला २५ जागा मिळण्याचा अंदाज असून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी ३५ टक्के लोकांची पसंती असल्याचं सर्व्हेतून सांगण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी टीका केली आहे.
नागपूर: काही दिवसांपूर्वी ‘न्यूज एरिना इंडिया’ या संस्थेने केलेल्या सर्व्हेत महाराष्ट्रामध्ये भाजपला सव्वाशे जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला २५ जागा मिळण्याचा अंदाज असून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी ३५ टक्के लोकांची पसंती असल्याचं सर्व्हेतून सांगण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी टीका केली आहे. “महाराष्ट्रात जाहिरातीवरून जे काही सुरु आहे, ते बंद करून सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे. शिवसेनेच्या एजन्सीकडून त्यांच्या सर्व्हेचे आकडे समोर आले, तर पाच-सहा दिवसानंतर भाजपच्या एजन्सीकडून सर्व्हे करून त्यांनी आपले आकडे समोर आणले. याचाच अर्थ असा की, आपल्याच एजन्सीकडून सर्व्हे करून घ्यायचा, स्वत:चा उदोउदो करायचा आणि जनतेची दिशाभूल करण्याचं काम करायचं,” असं देशमुख म्हणाले.