सरकारच्या दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर अखेर या प्रकरणात २२ दिवसांना खंडणीचा गुन्हा दाखल झालेले वाल्मिकी कराड पुणे सीआयडीला शरण आले आहेत. त्यामुळे आता त्यांची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावे अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्याकरण्यात आल्यानंतर या प्रकरणात २२ दिवसानंतर अखेर आरोपी वाल्मिक कराड शरण आला आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अपयश आले होते. त्यामुळे सर्वसामान्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. या प्रकरणात बीड जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. आता या प्रकरणाची चौकशी राज्य शासनाच्या कोणत्याही दबावाशिवाय करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. या प्रकरणात सुरुवातीपासून दिरंगाई झालेली आहे. महाराष्ट्राचे पोलिस सक्षम असताना या प्रकरणातील आरोपींना पकडता आले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे या प्रकरणातील दूध का दूध, पाणी का पाणी स्पष्ट पुढे यावे अशीही मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे.
Published on: Dec 31, 2024 03:10 PM
Latest Videos