राष्ट्रवादी टार्गेटवर, तर विरोधकांवर दबाव, हे भाजपचं षडयंत्र, अनिल देशमुख यांची टीका

राष्ट्रवादी टार्गेटवर, तर विरोधकांवर दबाव, हे भाजपचं षडयंत्र”, अनिल देशमुख यांची टीका

| Updated on: Aug 02, 2023 | 2:57 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर सध्या ईडीचा ससेमीरा सुरु आहे. जयंत पाटील यांची ईडी चौकशीही करण्यात आली आहे. त्यांच्या या चौकशीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे.

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर सध्या ईडीचा ससेमीरा सुरु आहे. जयंत पाटील यांची ईडी चौकशीही करण्यात आली आहे. त्यांच्या या चौकशीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. “दोन-अडीच वर्षात विरोधकांना टार्गेट करून त्रास दिला जात आहे. खासकरून राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केलं जात आहे. माझ्यावर सुद्धा कारवाई झाली, त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. गेल्या 50-60 वर्षात इतक्या खालच्या स्तराचे राजकारण महाराष्ट्रात कधीही झालं नाही.देशात कारवाई सुरू असलेला भाजपचा एक सुद्धा नेता सापडणार नाही. त्रास द्यायचा, राजकीय दबाव आणायचा असं षडयंत्र सुरू आहे”, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.

 

Published on: May 23, 2023 12:37 PM