“दिल्लीवरून यादी निघाली, महाराष्ट्रात आली की…”, खातेवाटपावरून अनिल देशमुख यांचा टोला
शिंदे-फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यावरून शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी मोठं विधान केलं आहे.
गडचिरोली : शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन एक वर्ष झालं तरी मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप अद्याप झालेला नाही. त्यात आता अजित पवारही सत्तेत सामील झाल्याने, कोणाला कोणतं खातं मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावरून युतीत रस्सीखेच पाहालया मिळत आहे. अशात विस्तार कधी होणार याची आस सर्व आमदार लावून बसले आहेत. याच घडामोडींवर शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “दिल्लीवरून यादी निघाली आहे. आता ती यादी मुंबईत पोहोचेल आणि नंतर एक तासात जाहीर होईल.”
Published on: Jul 14, 2023 01:35 PM
Latest Videos