“15 दिवसांत पाणी प्रश्व सोडवा अन्यथा…”, ठाकरे गटाचा राज्य सरकारल इशारा
दुषित पाणी पुरवठा, अपुरी नालेसफाई आणि पायाभूत सुविधांचा अभाव या मुद्द्यांवरून आज ठाकरे गटाने थेट मुंबई महापालिकेवर प्रचंड मोठा मोर्चा काढला. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी अनिल परब यांनी राज्य सरकारला इशारा दिला.
मुंबई : दुषित पाणी पुरवठा, अपुरी नालेसफाई आणि पायाभूत सुविधांचा अभाव या मुद्द्यांवरून आज ठाकरे गटाने थेट मुंबई महापालिकेवर प्रचंड मोठा मोर्चा काढला. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी अनिल परब यांनी राज्य सरकारला इशारा दिला. “15 दिवसांत स्थानिकांचा प्रश्न सोडवला नाही तर अधिकाऱ्यांच्या घरचं पाणी आम्ही तोडू. तसेच विभागात जो कचरा साठेल तो कचरा अधिकाऱ्यांच्या घरासमोर नेऊन टाकू”, असा इशारा अनिल परब यांनी दिला. तसेच शाखेत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता. तरीही पालिका अधिकाऱ्यांनी बुलडोझर फिरवला. शाखेला हात लावणारा तो कोणता पालिका अधिकारी आहे, हे मला पाहायचे आहे. त्या अधिकाऱ्याचा काय बंदोबस्त करायचा ते आम्ही करून घेऊ. शिंदे सरकारमध्ये हिंमत असेल तर संबंधित पालिका अधिकाऱ्यावर कारवाई करावी. कारवाई न झाल्यास त्या अधिकाऱ्याची कॉलर धरून त्याला उद्यापासून फिरवतो. कुठ-कुठ अनधिकृत बांधकाम आहे, हे त्या अधिकाऱ्याला दाखवतो. अधिकाऱ्याने ते अनधिकृत बांधकामही तोडावे. अन्यथा आम्ही तुम्हाला तोडू,” असंही अनिल परब म्हणाले.