आमदार जरी एकनाथ शिंदेंसोबत गेले असले तरी शिवसैनिक उद्धव ठाकरेंबरोबरच; 'या' नेत्याला विश्वास

आमदार जरी एकनाथ शिंदेंसोबत गेले असले तरी शिवसैनिक उद्धव ठाकरेंबरोबरच; ‘या’ नेत्याला विश्वास

| Updated on: Mar 05, 2023 | 2:04 PM

Anil Parab on Uddhav Thackeray Ratnagiri Khed Sabha : उद्धव ठाकरे यांची आज खेडमध्ये जाहीर सभा होतेय. सभेवर शिवसेना ठाकरेगटाचे नेते अनिल परब यांनी भाष्य केलंय. तसंच विरोधकांना इशाराही दिलाय. पाहा...

खेड, रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभा होतेय. संध्याकाळी सहा वाजता या सभेला सुरूवात होणार आहे. या सभेवर शिवसेना ठाकरेगटाचे नेते अनिल परब यांनी भाष्य केलंय. “आमदार जरी एकनाथ शिंदेंसोबत गेले असले तरी शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरेंबरोबर आहेत. हेच दाखवणारी आजची सभा असेल. आजच्या सभेला विराट गर्दी होणार आहे. त्यामुळे विरोधकांनी ही सभा जरूर पाहावी. राजन साळवींच्या मागे चौकशी माझ्यामागे ईडीची चौकशी लावली. मात्र आम्ही घाबरणारे नाहीत. निष्ठा विकणारे शिवसैनिक नाहीत. केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग होतोय. आजची सभा रेकॉर्ड ब्रेक होईल”, असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केली आहे.

Published on: Mar 05, 2023 02:04 PM