Anil Parab यांनी रिसॉर्टसंदर्भात ग्रामपंचायतीला लिहिलेलं पत्र ईडीच्या हाती?
26 जून 2019 ला लिहिलेलं पत्र ईडीच्या हाती लागल्याची प्राथमिक माहिती आहे. छापेमारीदरम्यान दापोलीतला रिसॉर्ट आपला नसल्याचा अनिल परबांनी दावा केला होता. विशेष म्हणजे ईडीच्या हाती जे पत्र लागलं आहे, ते कर आकारणीसाठी लिहीलं होतं.
अनिल परब (ANIL PARAB) यांच्यावरती राज्यात सात ठिकाणी ईडीने (ED) छापेमारी केली. त्यावेळी शिवसेना (SHIVSENA) पक्षातील अनेक नेत्यांनी आम्ही तुमच्यासोबत असल्याचे जाहीरपणे सांगितले. सध्या ईडीच्या हाती दापोलीतील साई रिसॉर्टच्या करारा संदर्भात मुरुड ग्रामपंचायतीला लिहिलेलं पत्र ईडीच्या हाती लागल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. 26 जून 2019 ला लिहिलेलं पत्र ईडीच्या हाती लागल्याची प्राथमिक माहिती आहे. छापेमारीदरम्यान दापोलीतला रिसॉर्ट आपला नसल्याचा अनिल परबांनी दावा केला होता. विशेष म्हणजे ईडीच्या हाती जे पत्र लागलं आहे, ते कर आकारणीसाठी लिहीलं होतं.
Latest Videos