राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितलं अजित पवार यांच्या बंडाचं खरं कारण; म्हणाला, “…म्हणून हा बंड पुकारला!”
पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी अजित पवार यांच्या शपथविधी संदर्भात काही गौप्यस्फोट केला आहे.
पुणे : पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी अजित पवार यांच्या शपथविधी संदर्भात काही गौप्यस्फोट केला आहे. “2024 मध्ये विधानसभेत जास्तीत जास्त आमदार निवडून आणून अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं आहे. या शपथविधीची शरद पवार यांना कल्पना नव्हती. मुंबई गाठल्यावर अजित पवारांनी या बंडासंदर्भात आम्हाला सांगितलं होतं. या शपथविधीच्या पूर्वी सुप्रिया सुळेंनी आमदारांशी चर्चा केली नाही. त्यावेळी हे बंड होणार असल्याचं त्यांनाही माहिती नसावं. मात्र मला मंत्रीपद मिळाल्याचं अजिबात दु:ख नाही. मात्र अजित पवारांना मुख्यमंत्री कऱण्याची राज्यातील जनतेची इच्छा होती. त्यामुळेच अनेक लोक अजित पवारांच्या गटात सामील झाले.”
Published on: Jul 11, 2023 11:02 AM
Latest Videos