Video :  गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

Video : गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

| Updated on: Apr 17, 2022 | 5:29 PM

वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण बीडमध्ये सदावर्ते यांच्यावर आता आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) अपशब्द वापरल्याने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भाजप तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर यांच्या तक्रारी वरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले […]

वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण बीडमध्ये सदावर्ते यांच्यावर आता आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) अपशब्द वापरल्याने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भाजप तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर यांच्या तक्रारी वरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत सदावर्तेंवर दाखल होणारा हा तिसरा गुन्हा आहे. सुरूवातीला शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. या आंदोलकांना भडकावल्याचा आणि सतत प्रक्षोभक भाषणं केल्याचा, कट रचल्याचा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई पोलिसांकडून ठेवण्यात आला. या गुन्ह्यात गुणरत्न सदावर्तेंना चार दिवस पोलीस कोठडीत मुक्कामी काढावे लागले, त्यानंतर त्यांचा ताबा हा सातारा पोलिसांना देण्यात आला.