शीतल म्हात्रे मॉर्फ व्हायरल व्हिडीओप्रकरणी ‘या’ आमदार पुत्राची तक्रार; गुन्हा दाखल
शीतल म्हात्रे मॉर्फ व्हायरल व्हिडीओप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांच्या तक्रारीवरून दहिसर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मुंबई : माजी नगरसेवक शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबईतील राजकारणाचा पारा चढला. हा व्हिडीओ मॉर्फ्ड करून व्हायरल करण्यात आल्याचा दावा शीतल म्हात्रे यांनी केला. दरम्यान, या मुद्द्यावरून विधानसभेत महिला आमदारांनी आवाज उठवला. त्यानंतर गदारोळ झाल्याने सभागृह 10 मिनिटे तहकूब करावे लागले. यादरम्यान शीतल म्हात्रे मॉर्फ व्हायरल व्हिडीओप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांच्या तक्रारीवरून दहिसर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा बदनामी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय ही चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारीत करणाऱ्या राजेश गुप्ता यालाही समता नगर पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.