शरद पवार यांच्या आणखी एका विरोधकाने दंड थोपटले, म्हणाले ‘लोकांचे लक्ष विचलित…’
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला वेगवेगळ्या सवलती देण्याचा प्रयत्न केला. आमच्या सरकारने टिकणारे आरक्षण दिले. मविआ सरकारचे नेते आणि मार्गदर्शक यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची ईच्छा नव्हती. आता पुन्हा आमचं सरकार आले आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणारच.
शिर्डी | 22 ऑक्टोंबर 2023 : अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आमच्या सोबत सत्तेत आहे. आमचं ट्रिपल इंजिन सरकार उत्तम पध्दतीने काम करतय. शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत. विषयांतर करून लोकांचे लक्ष विचलित करण्यात ते माहीर आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी कधी पुढाकार घेतला नाही. केंद्रात मंत्री असताना त्यांनी कधी केंद्रीय नेतृत्वावर दबाव आणला नाही. त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दलची भूमिका स्पष्ट करावी अशी टीका मंत्री राधाकुर्ष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केलीय. कुणबीतून आरक्षण मिळावे याबद्दल कुणाचेही दुमत नाही. ज्यांच्याकडे कुणबीचे पुरावे आहेत त्यांना सवलती मिळायला हरकत नाही. विदर्भात बहुतांश मराठा कुणबी झालेत. आरक्षण देण्याबद्दल सरकार बांधील आहे असेही ते म्हणाले.
Published on: Oct 22, 2023 10:55 PM
Latest Videos