टीव्ही 9 फेस्टीव्हल ऑफ इंडीया : TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद

टीव्ही 9 फेस्टीव्हल ऑफ इंडीया : TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद

| Updated on: Oct 13, 2024 | 10:11 PM

दिल्लीतील ध्यानचंद स्टेडियम येथे टीव्ही 9 फेस्टीव्हल ऑफ इंडीया साजरा होत आहे. या फेस्टीव्हलच्या तिसऱ्या दिवशाची सुरुवात मॉं भगवतीच्या आराधनेने झाली. त्यानंतर या महोत्सवाची सुरुवात झाली. या सोहळ्यात अपना दल पक्षाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी सहभाग घेतला आणि मॉं भगवती यांचा आशीवार्द घेतला.

नवरात्र आणि दसरा सणाच्या निमित्ताने दिल्लीच्या ध्यानचंद स्टेडियममध्ये दुसरा टीव्ही 9 फेस्टीव्हल ऑफ इंडीया महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तिसऱ्या दिवशी देखील टीव्ही 9 ने विधीवत देवीची पूजा करीत महोत्सवाची सुरुवात केली. सायंकाळ होताच या महोत्सवात अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. या सोहळ्यात अपना दल पक्षाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी सहभाग घेतला आणि मॉं शक्तीचा आशीर्वाद घेतला. या सोहळ्यात अनुप्रिया पटेल यांनी टीव्ही 9 फेस्टीव्हलमध्ये ढोल वाजवण्याचा देखील आनंद घेतला.

Published on: Oct 13, 2024 10:11 PM