शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार नाही तर… , केंद्रीय मंत्र्यानं व्यक्त केला विश्वास

| Updated on: Feb 14, 2023 | 4:22 PM

VIDEO | शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार नाही तर मजबुतीने महाराष्ट्राचा विकास होणार, काय म्हणाले अनुराग ठाकूर?

ठाणे : विरोधी पक्ष कायमच शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार, असे मत व्यक्त करत आहेत, यावर प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ते नुसतीच आशा धरून बसलेले आहेत. महाराष्ट्रात डबल इंजिनची ताकद आणखी वाढेल, सरकार जाणार असल्याची आशा असलेल्यांना निराशा पत्करावी लागेल, असा टोलाही ठाकुर यांनी लगावला. विशेष म्हणजे हे सरकार कोसळणार नाही तर अधिक मजबुतीने महाराष्ट्राचा विकास करणार आहे असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. देशातील ईशान्येकडील राज्यांबरोबरच तमिळनाडूतूनही भाजपाला वाढता प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०२४ च्या निवडणुकीत भाजपाचाच विजय होईल, असा विश्वासही अनुराग ठाकुर यांनी व्यक्त केला. अनुराग ठाकूर हे भाजप पक्षवाढीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

Published on: Feb 14, 2023 04:22 PM
नवनीत राणा आणि रवी राणा यांचा व्हॅलेंटाईन डे, बघा सेलिब्रेशनचा अनोखा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीस बोलले तो गौप्यस्फोट नव्हे तर…; रोहित पवार यांचा जोरदार पलटवार