श्रीभक्तांपेक्षा राजकीय नेत्यांची सोय पाहण्यात आल्यानं ही घटना घडली; राऊत यांची खरमरीत टीका
उद्ध ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाना साधत टीका केली आहे. त्यांनी, आम्हाला या सोहळ्यावर टीका करायची नाही. कारण आम्ही स्वत: अप्पासाहेबांना मानतो. त्यांचं मानवतेचं काम मानतो. तरी जे मृत्यू झाले ते दु:खदायक आहे
मुंबई : ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल (16 एप्रिल) महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान उष्माघाताचा त्रास होऊन 11जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर या कार्यक्रमावरून वरिधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे. याचदरम्यान उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाना साधत टीका केली आहे. त्यांनी, आम्हाला या सोहळ्यावर टीका करायची नाही. कारण आम्ही स्वत: अप्पासाहेबांना मानतो. त्यांचं मानवतेचं काम मानतो. तरी जे मृत्यू झाले ते दु:खदायक आहे. समोर बसलेले सहा-सात लाख लोकांची सोय न पाहता, व्यासपीठावरील अप्पासाहेब वगळता इतर राजकीय नेत्यांची सोय पाहिली गेली. अप्पासाहेब आणि समोर बसलेला समूह राजकीय नव्हता. पण भक्तांपेक्षा राजकीय नेत्यांची सोय पाहण्यात आल्यानं ही घटना घडल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.
Published on: Apr 17, 2023 11:01 AM
Latest Videos