मविआच्या वज्रमुठ सभेवर शिंदे यांच्या मंत्र्याची टीका; म्हणाले, त्यांना आता काम नाही

मविआच्या वज्रमुठ सभेवर शिंदे यांच्या मंत्र्याची टीका; म्हणाले, त्यांना आता काम नाही

| Updated on: Apr 16, 2023 | 12:59 PM

त्यांनी आज एकीकडे ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्रभूषण’ सन्मानाने गौरविण्यात येत आहे. आजच्या पवित्र दिनी, मंगलमयदिनी मविआ सभा घेत आहे

खारघर : ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना ‘महाराष्ट्रभूषण’ सन्मानाने आज (ता. 16) गौरविण्यात आले. हा कार्यक्रम नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला. या दरम्यान शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी महाविकास आघाडीच्या सभेवर टीका केली. त्यांनी आज एकीकडे ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्रभूषण’ सन्मानाने गौरविण्यात येत आहे. आजच्या पवित्र दिनी, मंगलमयदिनी मविआ सभा घेत आहे. यासभेत टीका-टीपणी, टोमणे, आर्वाच्य भाषेचा वापर केल जाणार, सभेत आमचे विरुद्ध बोलणार. याकडे आम्ही लक्ष देत नाही. हा चांगला कार्यक्रम आहे. या पवित्र दिनी, शुभ दिनी आपण चांगलं बोलूया आणि जे चांगलं काम शिंदे साहेबांचे नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण पुढे घेऊन चाललेलो आहे त्याला राज्यातल्या जनतेचा भरभरून पाठिंबा आहे हे निश्चित असे ते म्हणाले.

Published on: Apr 16, 2023 12:59 PM